पोस्ट्स

जीवनातील सत्य लेख

                     *मित्रानो 2 मिनिट वेळ काढून नक्की वाचा खूप सुंदर आहे*    *मनात घर करुन जाईल* 👌👌👌👌👌👌👌👌👌एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही. एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला. खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो. त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले. हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?" "साहेब" भिकारी म्हणतो, "माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा." तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो. त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकज

जीवन

छानसं पुन्हा पुन्हा वाचाव अस :      आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. सर्व ऐशोआराम, सुख पायाशी लोळत असूनही तो नेहमीच चिंतेत असायचा.त्याला समाधान असे कधीच वाटले नाही. एके दिवशी असाच विचार करत असतांना त्याचे लक्ष एका नोकराकडे गेले.काम करीत असतांना तो स्वतःशीच छानस गाण गुणगुणत होता.त्याचा सदोदित आनंदी चेहरा पाहून राजाला आश्चर्य वाटले.राजा विचार करू लागला, " मी येवढा सार्वभौम राजा असुनही समाधानी,आनंदी नाही आणि हा माझा यत्ःकिचीत नोकर मात्र एवढा प्रफुल्लित, आनंदी कसा ?"      राजाने नोकराला विचारले," तू एवढा आनंदित कसा काय राहतोस ?"     नोकर उद्गारला," महाराज !  मी आपला एक मामूली नोकर .माझ्या कुटूंबाच्या गरजा फारच थोड्या आहेत. मला फक्त डोक्यावर छप्पर आणि पोट भरण्यासाठी गरमागरम अन्न असले म्हणजे पूरे ! "      राजा विचारात पडला व आपल्या अत्यंत विश्वासू प्रधानास ही गोष्ट सांगितली.      सर्व वृत्तांत ऐकल्यावर प्रधान म्हणाला," हे राजन्, हा नोकर अद्याप " ९९ -क्लब " चा मेंबर झालेला नाही म्हणून तो अत्यंत आनंदात आहे."     राजाने। विचारले,"
इमेज
       स्री..                                               मृत्युंजयमध्ये 'स्त्री' वर लिहिली गेलेली वाक्य जर एकत्र आणली; मागे-पुढे, वर-खाली असा त्यांचा योग्य क्रम लावला आणि त्याला आपल्या बुद्धिमत्तेचा एक हळुवार स्पर्श दिला तर 'स्त्री' या विषयावर वास्तवाचं दर्शन घडविणारा एक निबंधच तयार होईल. वाचणार का ? ••● 'स्त्री' ●•• स्त्री म्हणजे विधात्याने आपल्या पहिल्याच साखरझोपेच्या वेळी टाकलेला सुंदर निश्वास असावा; त्या निश्वासात पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ती असते. स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो. अपमानाचे कडू घोट धैर्यानं पचवू शकतो. आयुष्यात येणाऱ्या संकटांना नव्या जोमाने सामोरा जाऊ शकतो. विश्वकर्ता हा जग रंगविणारा एक कुशल रंगारी असेल तर स्त्री ही त्यानं रंगविलेली सर्वोत्कृष्ट रंगाकृती म्हंटली पाहिजे. सर्व जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि प्रभावी कुंचल्यानं रंगविलेली पूर्णाकृती ! पण खरोखर स्त्रीचं जीवन एवढं सहजसोपं असतं का ? मुळीच नाही ! स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी ! कधी ती कुणाची
* ऑफिसमधील शाळेतील ताण आणि निगेटिव्हिटी दूर ठेवतील या खास टीप्स*.                                    संकलन श्री बाजीराव दिनकर रक्ताडे                           वि मं सुरुपली 9420353253                    कामाच्या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, विचारधारणेची लोकं एकत्र काम करत असतात. आजकाल कॉपरेट क्षेत्रामध्ये 'टार्गेट'मागे धावताना दिवसातला सर्वाधिक वेळ अनेकजण ऑफिसमध्ये असतात. अशावेळेस ताणतणावामुळे, वैचारिक मतभेदांमुळे भांडणं किंवा वाद होणं स्वाभाविक असतो. सतत अशा वातावरणात राहिल्याने सहाजिकच तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. कामाचा ताण किंवा राग तुमच्या प्रिय व्यक्तीवर किंवा कुटुंबावरही नकळत काढला जातो. तुमच्या या एका लहानशा चूकीमुळे सारं बिघडू शकतं. मग हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. भांडणं टाळा - तुमचे काही लोकांसोबत मतभेद असले तरीही त्याचे परिवर्तन भांडणामध्ये होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हांला एखादी गोष्ट, व्यक्ती पटत नसेल तर त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. इसेन्शियल ऑईल -  ताण हलका करण्यासाठी इसेन्शियल ऑईल फायदेशीर आहे. तुमच्य